३ रामचंद्र सखाराम गोंजुमामा (गुंजुमामा) करमरकर
-- सांगली(4j)
नानासाहेब पेशवे ( नेपाळ) यांच्या पत्नी तीन सारजाबाई -विवाह बहुदा १८३६ साली पिता करमरकर २) सारजाबाईपिता पाटणकर व ३) कृष्णाबाई उर्फ़ पार्वतीबाई - सर्व काकुसाहेब म्हणत विवाह १८५६ या सांगलीचे रामचंद्र सखाराम उर्फ़ गोंजुमामा(गुंजु मामा)करमरकर यांची कन्या असुन माहेरचे नाव सुंदराबाई होते लग्न ठरविण्याच्या वेळी नानासाहेबांच उपाध्ये कर्व सांगलीस मुलीला पाहण्यास आले तेव्हा तिच्या पात्रिकेवरुन सांगितले की या मुलीच्या लग्नानंतर लवकरच युध्द व रक्तपात होण्याचा योग आहे पण इतर मुलीपेक्षा ही मुलगी सुंदर असल्याने पसंत करुन विवाह केला व ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे १८५७ ला सुमारे वर्षभरात युध्द पेटले लग्नाच्यावेळी मुलीचे वय सुमारे १३ वर्ष होते.लग्न ब्रह्मावर्ताला झाले स्वभावाने फ़ार विनयशील होत्या मृत्यू नेपाळमध्ये राणीगंज येथे राहत्या वाड्यात सन १८८६ साली झाला म्हणजेच आपल्या करमरकर घराण्यातील एक माहेरवाशीण पेशव्यांकडे सुन म्हणुन वावरली.
लेखाच्या सुरुवातीला म्ह्टल्याप्रमाणे मनातील औत्सुक्याने पेशवे यांच्यासंबधीचे लिखाण वाचत गेले आणि वाचतांना मिळालेले करमरकर संबधीचे उल्लेख गोळा केले त्या सर्व उल्लेखांचे हे संकलन आहे हा लेख वाचुन करमरकर कुळातील एखाद्या इतिहासप्रेमी व्यक्तीला या संबधी आणखी संशोधन करण्याची इच्छा झाली तर त्यात लेखाचे सार्थकच होईल.
संदर्भ ग्रंथ
1)selections from the peshwa Dafter(New Series )-3
"Revival of maratha Power "(1761-1772)
General Editor Dr.P.M.Joshi,Director of Archives & Historical Monuments Govt Of Maharashtra'Govt .Centeral Press,Bombay 1962
a)पत्र क्र.६५ २६.०१.१७७१
२) पेशवे दप्तरांतुन निवडलेले कागद-३६
इंग्रज- मराठ्याचे पाहिले युध्द
संपादक-गो.स. सरदेसाई, बी .ए.
गव्हर्मेट सेट्रल प्रेस मुबंई १९२४
b) पत्र क्र 2 ७.१२.१७७३
c) १४.१२.१७७३
d)पत्र क्र २४२ ०९.०७.१७७५
३ पेशव्याची बखर -संपादक भीमराव कुलकर्णी
अनमोल प्रकाशन पुणे-२
e)पान ६०-६१ परिच्छेद ९५
f)पान ७१-७२ परिच्छेद ११९
g)पान ७६ परिच्छेद १२७
h)पान १२० परिच्छेद २०५
i)पान १२३ परिच्छेद २०९
४)पेशवे घराण्याचा इतिहास
संपादक- प्र.ग.ओक प्रथम आवृत्ती,३मे १९८५
j)पान 212
|